Skip to main content

खानदेशात थंडीची लाट वाढली | कधीपर्यंत राहील खानदेशात थंडीचे वातावर

खान्देशात तापमान एकाच दिनात तबबल 4. 5 अंश सेल्सिअसची झा घटली आहे . गुरुवार का मान तापमान 14 अंश सेल्सियस नोंदवले गेले . ढगाळ माहौल वाऱ्याचा वेगही ताशी 16 किलोमीटर असल्याने थंडीचा गारठा वाढला . 


 जिल्ह्यात किमान तापमानात एकाच दिवसात तब्बल ४. ५ अंश सेल्सिअसची घट झाली आहे . गुरुवारी किमान तापमान १४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले . ढगाळ वातावरणात वाऱ्याचा वेगही ताशी १६ किलोमीटर असल्याने थंडीचा गारठा वाढला . पूर्व किनारपट्टीवरील वादळाचा प्रभाव म्हणून राज्यात वातावरण ढगाळ आहे उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणात गार वारे वाहत आहेत . जळगाव जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवसात १८. ५ अंशावर असलेला किमान तापमानाचा पारा अवघ्या १४ अंशांवर आला होता . रात्रीच्या वेळी ताशी १६ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी गारठा अधिक वाढवला होता . त्यामुळे दिवसाच्या तब्बल ५५ टक्के ढगाळ वातावरणात कमाल तापमान ● अंशांवर आले होते . पुढील चार दिवस राज्यात ढगाळ स्थिती कायम राहील . उत्तर महाराष्ट्रात १२ डिसेंबरपर्यंत वातावरण ढगाळ राहील तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे .



Popular posts from this blog

केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी | 54 कोटी मंजूर...

नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी... जामनेर : मे व जून महिन्यात जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या ४ ९ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी ५४ कोटी रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम मिळाली आहे . पंतप्रधान फळपीक विमा अंतर्गत विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम अदा करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे . केळीसह पपई , आंबा , मोसंबी , डाळिंब उत्पादकांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम अदा करण्यात आली आहे . दरवर्षी जिल्ह्यात जागतिक हवामानातील बदलाचे परिणाम जाणवत आहेत . या हवामान बदलामुळे मे - जून किंवा मग मार्च महिन्यात सातत्याने चक्रीवादळाचा प्रकोप जिल्ह्यात होत आहे . गेल्या वर्षी देखील जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये वादळी पावसामुळे केळीच्या बागा उध्वस्त झाल्या होत्या . शेतकऱ्यांच्या हातातील पीक वाया गेल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता . कृषी विभागाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे जून व जुलै महिन्यातच पूर्ण केले होते . मात्र , नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला शेतकऱ्यांना सहा महिने प्र...

जळगावकरांचा नदी जोड प्रकल्पात मोठा फायदा | Happy's moment jalgaon farmers|

  नार - पार - गिरणा नदीजोड योजनेमुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ५८ हजार ७६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे . या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला असून येत्या दोन महिन्यात या संदर्भातील सर्व मान्यता मिळवून मंत्री उपसमिती आणि मंत्रिमंडळ बैठकीतही त्यास मान्यता देण्यात येईल " , अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली . हिवाळी अधिवेशनात विधानसभा सदस्य डॉ राहुल आहेर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती .  त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते . ते म्हणाले की , नार - पार - औरंगा व अंबिका या चार पश्चिम वाहिनी नद्या महाराष्ट्रात उगम पावून पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रात मिळतात . हे अतिरिक्त पाणी उपसा करून पूर्वेकडील अती तुटीच्या गिरणा उपखोऱ्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही योजना प्रस्तावित केली आहे . एकात्मिक राज्य जल आराखड्यातील तरतुदीनुसार नार , पार , औरंगा व अंबिका या पश्चिम वाहिनी नदीखोऱ्यातील ३०४. ६ दलघमी पाणी नार - पार गिरणा नदी जोड योजनेसाठी वळविण्याचे नमूद आह...