जळगांव : जिल्ह्यात सर्वाधिक चार लाख ४५ हजार ७४७ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. पेरणी सुरू आहे, मात्र पावसाचा अडथळा आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे आता खरीप हंगामाच्या पेरणीने वेग घेतला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 5 लाख 54 हजार 675 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे.
नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी... जामनेर : मे व जून महिन्यात जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या ४ ९ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी ५४ कोटी रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम मिळाली आहे . पंतप्रधान फळपीक विमा अंतर्गत विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम अदा करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे . केळीसह पपई , आंबा , मोसंबी , डाळिंब उत्पादकांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम अदा करण्यात आली आहे . दरवर्षी जिल्ह्यात जागतिक हवामानातील बदलाचे परिणाम जाणवत आहेत . या हवामान बदलामुळे मे - जून किंवा मग मार्च महिन्यात सातत्याने चक्रीवादळाचा प्रकोप जिल्ह्यात होत आहे . गेल्या वर्षी देखील जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये वादळी पावसामुळे केळीच्या बागा उध्वस्त झाल्या होत्या . शेतकऱ्यांच्या हातातील पीक वाया गेल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता . कृषी विभागाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे जून व जुलै महिन्यातच पूर्ण केले होते . मात्र , नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला शेतकऱ्यांना सहा महिने प्र