जळगांव : जिल्ह्यात सर्वाधिक चार लाख ४५ हजार ७४७ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. पेरणी सुरू आहे, मात्र पावसाचा अडथळा आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे आता खरीप हंगामाच्या पेरणीने वेग घेतला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 5 लाख 54 हजार 675 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. एकूण सरासरी क्षेत्राच्या ७२ टक्के पेरणीचे प्रमाण आहे. जामनेर तालुक्यात यंदा खरीपाची सर्वाधिक ६८ हजार १९ हेक्टरवर पेरणी झाली. कपाशीची सर्वाधिक पेरणी ४ लाख ४५ हजार ७४७ हेक्टरवर झाली आहे.
नार - पार - गिरणा नदीजोड योजनेमुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ५८ हजार ७६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे . या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला असून येत्या दोन महिन्यात या संदर्भातील सर्व मान्यता मिळवून मंत्री उपसमिती आणि मंत्रिमंडळ बैठकीतही त्यास मान्यता देण्यात येईल " , अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली . हिवाळी अधिवेशनात विधानसभा सदस्य डॉ राहुल आहेर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती . त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते . ते म्हणाले की , नार - पार - औरंगा व अंबिका या चार पश्चिम वाहिनी नद्या महाराष्ट्रात उगम पावून पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रात मिळतात . हे अतिरिक्त पाणी उपसा करून पूर्वेकडील अती तुटीच्या गिरणा उपखोऱ्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही योजना प्रस्तावित केली आहे . एकात्मिक राज्य जल आराखड्यातील तरतुदीनुसार नार , पार , औरंगा व अंबिका या पश्चिम वाहिनी नदीखोऱ्यातील ३०४. ६ दलघमी पाणी नार - पार गिरणा नदी जोड योजनेसाठी वळविण्याचे नमूद आहे .