Skip to main content

जळगावकरांचा नदी जोड प्रकल्पात मोठा फायदा | Happy's moment jalgaon farmers|

 नार - पार - गिरणा नदीजोड योजनेमुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ५८ हजार ७६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे . या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला असून येत्या दोन महिन्यात या संदर्भातील सर्व मान्यता मिळवून मंत्री उपसमिती आणि मंत्रिमंडळ बैठकीतही त्यास मान्यता देण्यात येईल " , अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली . हिवाळी अधिवेशनात विधानसभा सदस्य डॉ राहुल आहेर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती . 







त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते . ते म्हणाले की , नार - पार - औरंगा व अंबिका या चार पश्चिम वाहिनी नद्या महाराष्ट्रात उगम पावून पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रात मिळतात . हे अतिरिक्त पाणी उपसा करून पूर्वेकडील अती तुटीच्या गिरणा उपखोऱ्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही योजना प्रस्तावित केली आहे . एकात्मिक राज्य जल आराखड्यातील तरतुदीनुसार नार , पार , औरंगा व अंबिका या पश्चिम वाहिनी नदीखोऱ्यातील ३०४. ६ दलघमी पाणी नार - पार गिरणा नदी जोड योजनेसाठी वळविण्याचे नमूद आहे . या योजनेमध्ये ९ धरणे प्रस्तावित आहेत . त्यातून २६० . ३० दलघमी पाणी ऊर्ध्वगामी नलिकेद्वारे उपसा करून चणकापूर धरणाच्या पाणलोट क्षे त्रात सोडण्याचे प्रस्तावित असून पुढे ७ ९ . ९ २ कि . मी . लांबीच्या प्रवाही बंद नलिकेद्वारे सिंचन करणे प्रस्तावित आहे . त्याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा , कळवण , देवळा , मालेगाव व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव , पारोळा , भडगाव तालुक्यांतील एकूण ५८ हजार ७६१ हेक्टर क्षेत्राला मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली .

Popular posts from this blog

केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी | 54 कोटी मंजूर...

नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी... जामनेर : मे व जून महिन्यात जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या ४ ९ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी ५४ कोटी रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम मिळाली आहे . पंतप्रधान फळपीक विमा अंतर्गत विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम अदा करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे . केळीसह पपई , आंबा , मोसंबी , डाळिंब उत्पादकांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम अदा करण्यात आली आहे . दरवर्षी जिल्ह्यात जागतिक हवामानातील बदलाचे परिणाम जाणवत आहेत . या हवामान बदलामुळे मे - जून किंवा मग मार्च महिन्यात सातत्याने चक्रीवादळाचा प्रकोप जिल्ह्यात होत आहे . गेल्या वर्षी देखील जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये वादळी पावसामुळे केळीच्या बागा उध्वस्त झाल्या होत्या . शेतकऱ्यांच्या हातातील पीक वाया गेल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता . कृषी विभागाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे जून व जुलै महिन्यातच पूर्ण केले होते . मात्र , नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला शेतकऱ्यांना सहा महिने प्र

खानदेशात थंडीची लाट वाढली | कधीपर्यंत राहील खानदेशात थंडीचे वातावर

खान्देशात तापमान एकाच दिनात तबबल 4. 5 अंश सेल्सिअसची झा घटली आहे . गुरुवार का मान तापमान 14 अंश सेल्सियस नोंदवले गेले . ढगाळ माहौल वाऱ्याचा वेगही ताशी 16 किलोमीटर असल्याने थंडीचा गारठा वाढला .   जिल्ह्यात किमान तापमानात एकाच दिवसात तब्बल ४. ५ अंश सेल्सिअसची घट झाली आहे . गुरुवारी किमान तापमान १४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले . ढगाळ वातावरणात वाऱ्याचा वेगही ताशी १६ किलोमीटर असल्याने थंडीचा गारठा वाढला . पूर्व किनारपट्टीवरील वादळाचा प्रभाव म्हणून राज्यात वातावरण ढगाळ आहे उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणात गार वारे वाहत आहेत . जळगाव जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवसात १८. ५ अंशावर असलेला किमान तापमानाचा पारा अवघ्या १४ अंशांवर आला होता . रात्रीच्या वेळी ताशी १६ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी गारठा अधिक वाढवला होता . त्यामुळे दिवसाच्या तब्बल ५५ टक्के ढगाळ वातावरणात कमाल तापमान ● अंशांवर आले होते . पुढील चार दिवस राज्यात ढगाळ स्थिती कायम राहील . उत्तर महाराष्ट्रात १२ डिसेंबरपर्यंत वातावरण ढगाळ राहील तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे .

Lokmat epaper Jalgaon | जळगांव जिल्यातील बातम्या | Jalgaon news today |

जळगांव : जिल्ह्यात सर्वाधिक चार लाख ४५ हजार ७४७ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. पेरणी सुरू आहे, मात्र पावसाचा अडथळा आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे आता खरीप हंगामाच्या पेरणीने वेग घेतला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 5 लाख 54 हजार 675 हेक्‍टरवर पेरणी पूर्ण झाली आहे.         एकूण सरासरी क्षेत्राच्या ७२ टक्के पेरणीचे प्रमाण आहे. जामनेर तालुक्यात यंदा खरीपाची सर्वाधिक ६८ हजार १९ हेक्टरवर पेरणी झाली. कपाशीची सर्वाधिक पेरणी ४ लाख ४५ हजार ७४७ हेक्टरवर झाली आहे.